गूगलच्या सेवा
आपण जेव्हा इंटरनेटवर एखादी गोष्ट शोधतो, तेव्हा साहजीकच एखाद्या शोध यंत्राचा वापर करतो. आज आपल्याला अनेक शोध यंत्र ही सेवा पुरवतात. गूगल ही त्यापैकीच एक आहे. इतर शोध यंत्राच्या मानाने गूगल चा वापर लोक जास्तच करतात. गुगल ची स्थापना ल्यारी पेज व सर्जेई ब्रिन यांनी ७ सप्टेंबर १९९८ रोजी केली. गूगल हे नाव googol या मूळ इंग्रजी नावावरून घेतलेले आहे. googol याचा अर्थ एकावर १०० शून्ये असा होतो. गूगल चे मुख्य कार्यालय अमेरिकेतील क्यालीफोर्निया राज्यातील माउंटेन व्ह्यू येथे आहे.गूगल शोधयंत्रासोबतच अनेक सेवा पुरवते. त्या पुढील प्रमाणे आहे.१. जीमेल - गूगल ने २००४ मध्ये ही सेवा चालू केली, तेव्हापासूनच याची लोकप्रियता वाढत आहे. याआधीही अनेक इमेल सेवा पुरवनार्या कंपन्या होत्या, त्या मानाने जीमेल ही जास्त सुविधा देणारी गूगल ची सेवा आहे. याआधी ज्या काही इमेल सेवा देणार्या कंपन्या होत्या, त्यांचा जागेचा प्रश्न होता त्यामुळे जास्त इमेल साठवून ठेवता येत नसे. पण जीमेल मध्ये नोंदणीकृत खातेधारकांणा १० जीबी पर्यंत फ्री जागा मिळते, त्यामुळे जास्तीत जास्त इमेल आपण साठवून ठेऊ शकतो. शिवाय एखादा इमेल शोधताना सुद्धा जास्त त्रास होत नाही.
२.ब्लॉगर - ब्लॉगर ही एक वेब डायरी आहे, ज्यात आपण वेळेनुसार नोंदी करू शकतो. ब्लॉगचा वापर बरेचशे लोक वेबसाईट सारखा सुद्धा करतात. वेबसाईट च्या तुलनेत ब्लॉग वर तेव्हढ्या सुविधा मिळत नाही. मात्र कोणतीही आर्थिक गुंतवणूक न करता आपले विचार आपण जगात कुठेही लोकांपर्यंत पोहचवू शकतो. ब्लॉगर एकच व्यक्ती स्वतंत्रपने किंवा अनेक व्यक्ती मिळून लिहू शकतात. blogspot.com या डोमेन नेम सोबत आपल्याला सबडोमेन मिळते किंवा स्वतंत्र डोमेन नेम विकत घेऊन सुद्धा येथे वापरता येते. ब्लॉग जगातल्या जवळपास सगळ्या प्रमुख भाषेमध्ये लिहिता येतो. आधीच उपलब्ध असलेले ब्लागर टेंप्लेट वापरून आपण आपला ब्लाग अधिक आकर्षक करू शकतो. तसेच त्यामध्ये बदल पण करू शकतो.
३. युट्यूब - ही सेवा महाजालावर चलचित्र पाहण्यासाठी सुरु केलेली आहे. याचा वापर बर्याच व्यावसाईकांनी जरी केलेला असला तरी, बहुतेक सामान्य लोकच यावर चलचित्र टाकत असतात. यातील चलचित्र दाखवण्यासाठी अडोब फ्ल्याश तंत्रज्ञानाचा वापर केला जातो, जे html5 यावर काम करतं. जवळपास सगळेच चलचित्र सर्वांना बघता येतात. मात्र काही अश्लील, अपराधिक, मानहानी, जाहिरात ई. प्रकारचे चलचित्र मात्र १८ वर्षाच्या वरील व्यक्तींनाच बघता येतात. त्यासाठी आधी लॉग इन करून स्वयंचलीत यंत्रणेद्वारे आपलं वय तपासलं जाते.
४. गुगलप्लस - ही सेवा २०११ मध्ये चालू झाली. ही सोशल नेटवर्किंग साईट आहे. नोंदणीकृत गुगल खातेधारकांना ही सुविधा वापरता येते. यासाठी नव्याने नोंदणी करावी लागत नाही. डॉक्स, ड्राईव्ह किंवा ब्लागर वरील पोस्ट येथे शेअर करता येतात.
५. ट्रान्सलेट - गुगल अनुवाद ही एका भाषेतून दुसर्या भाषेमध्ये अनुवाद करण्यासाठी दिलेली सेवा आहे. यामध्ये एखादे वेबपेज कॉपी पेस्ट करून अनुवाद करू शकतो. अनुवाद करण्यासाठी गुगल स्वताचा प्रोग्राम वापरतो. जगातल्या प्रमुख भाषा येथे उपलब्ध आहेत.(मराठी मात्र नाही) यामध्ये केलेला अनुवाद आपण समजू शकतो, मात्र हा अनुवाद तंतोतंत जुलेलाच असे नाही.
६. ड्राईव्ह - येथे आपल्याला बर्याच प्रकारच्या फाईल साठवून ठेवता येतात. गुगल ड्राईव्ह वर आपल्याला १५ जीबी पर्यंत जागा फ्री मध्ये मिळते. गुगल ने ही सेवा २४ एप्रिल २०१२ मध्ये चालू केली. येथे आपल्याला गुगल डॉक्स पण वापरू शकतो. येथे साठवलेल्या फाईल शेअर सुद्धा करू शकतो.
७. पिकासा - पिकासा ही सेवा गूगल ने फोटो शेअर करण्यासाठी सुरु केली आहे. स्प्यानीस चित्रकार पाबलो पिकासो याच्या नावावरून पिकासा हे नाव घेतलेले आहे. ही सेवा आपण कोणतेही शुल्क न देता वापरू शकतो. येथे आपण सुंदर फोटो अल्बम तयार करू शकतो. गूगल ने येथे बेसिक फोटो एडिटिंग पर्याय सुद्धा उपलब्ध करून दिलेले आहे. त्याद्वारे आपण येथेच रंगात बदल करणे, फोटोचा आकार कमी जास्त करणे, रेड आई रिडक्शन तसेच शो, प्रिंटींग ई. पर्याय वापरू शकतो
No comments:
Post a Comment