कास ई लर्निंगची

कास ई.लर्निंगची
माहिती संप्रेषण आणि तंत्रज्ञानाचा वापर
करण्यासाठी  tech savvy teachers या
व्हाट्सपवरिल ग्रुपची शासनास खालील गोष्टींची
अंबलबजावणी करण्याची मागणी.
गट अ) ICT चा प्रत्यक्ष अध्यापनात वापर –
(गुणवत्ता) -
a) दर्जेदार डिजिटल साहित्य तयार करणे.(ppt,
video, Animation, Word, Excel..Etc.)
b) साहित्य वितरण.
c) साहित्य वापराचे शिक्षकांना (केंद्रस्तरावर)
प्रशिक्षण.
d) प्रत्यक्ष अध्यापनात वापर.
e) वापर होतो की नाही याची पडताळणी.
गट ब) ICT चा कार्यालयीन वापर –(प्रशासन) -
a) तालुका स्तरावर शाळा,शिक्षक,विद्यार्थी
यांच्या संबंधित डेटा एकत्रित करून ठेवणे.
b) संगणक प्रणाली (सोफ्टवेअर), ऑनलाईन वेब
पोर्टल विकसित करणे.
c) त्याच्या वापराचे (केंद्रस्तरावर) प्रशिक्षण
देणे.
d) प्रत्यक्ष वापर करणे.
गट क) ICT मधून इंटरनेटचा वापर –(गुणवत्ता व
प्रशासन) -
a) अध्यापनात वापर.
b) कार्यालयीन कामात वापर.
c) वापर कसा करावा याचे (केंद्रस्तरावर)
प्रशिक्षण.
गट ड) ICT चे अध्यापन -
a) विद्यार्थी केंद्रित पाठ्यक्रम निर्मिती.
b) पाठ्यक्रमावर आधारित साहित्य निर्मिती.
c) त्याची राबवणूक व्हावी म्हणून प्रयत्न.
राबविणाऱ्या शाळांचा गौरव.
d) त्याचे मूल्यमापन.
उद्देश –
१) ICT ची ओळख करून देणे.
२) संगणकाबद्दल मनातली भीती दूर करून धूळ खात
पडलेले संगणक सुरु करणे.
३) शिक्षकांना संगणकाच्या वापराबद्दल आवड
निर्माण करणे.
४) शिक्षकांना गरजेपुरते संगणक प्रशिक्षित करणे.
५) प्रत्यक्ष अध्यापनात आणि कार्यालयात
संगणकाच्या वापराने कामाचा भार कसा हलका होईल
हे पटवून त्यांना प्रोत्साहित करणे.
६) दप्तराचे ओझे कमी करणे.
७) विद्यार्थी संगणक साक्षर करणे.
कार्यवाही –
१) राज्यस्तरीय व जिल्हा स्तरीय निवडीसाठी
प्रत्येक जिल्ह्यातून खऱ्या अर्थाने या उपक्रमाशी
संबंधित तज्ज्ञ शिक्षक आहेत त्यांचा शोध घेणे.
ब्लॉग असणारे सगळेच शिक्षक तज्ज्ञ असतीलच
असे नाही. निवड करताना खऱ्या अर्थाने योग्य
शिक्षकच यात येतील असा प्रयत्न व्हावा. फक्त
संगणकाचे जुजबी ज्ञान असणारे शिक्षक प्रथमतः
नियोजन गटात नसावेत. हा गट म्हणजे मित्र मंडळ
होऊ नये किंवा एकाच जिल्ह्याचा प्रोजेक्ट होऊ नये.
जिल्हा निहाय प्रतिनिधित्व असावे. निवडीसाठी
पात्रता ठरवावी व त्याची छाननी संगणक
तज्ज्ञाकडून करून घेता आली तर उत्तमच.
२) त्यानंतर राज्य,जिल्हा, तालुका अशा प्रकारे गट
तयार करणे. या स्तरावर प्रशिक्षणासाठी बोलावले
जाणारे शिक्षक बळजबरीने बोलावलेले नसावेत.
३) या गटाच्या संचालनासाठी तालुक्यात एखादा
अधिकारी आणि जिल्ह्यात DIET चे
अधिव्याख्याते प्रमुख असावेत. तंत्रस्नेही शिक्षक
त्यांना मदतीसाठी सहप्रमुख म्हणून असावेत.
तंत्रस्नेही शिक्षक गटप्रमुख म्हणून नेमल्यास अनेक
समस्या येऊ शकतात. त्याच्या गटातील सर्व
सदस्य त्याचा आदर करतीलच असे नाही किंवा
त्याच्याकडून निपक्षपणे वागणूक मिळेलच असे नाही.
४) प्रशिक्षणात कशाचे प्रशिक्षण द्यायचे हे
ठरवावे.(ppt, video, Animation, Word,
Excel..Etc.) राज्यापासून ते शाळा स्तरापर्यंत
प्रशिक्षण दिले जावे.
५) जिल्हा निहाय विषय व घटक विभागून देऊन
साहित्य तयार करणे. तयार झालेले साहित्य
शासनाच्या वेब पोर्टल वर असावे. खाजगी कुणाच्या
वेबवर असू नये.
६) Android app, प्रोजेक्टर, ब्लॉग, टॅब
महत्वाचे नसून ICT चा (संगणकाचा) वापर सुरु
करणे महत्वाचे आहे. या दृष्टीने हा उपक्रम सुरु
व्हावा.
७) केंद्र पातळीवर एखादा शिक्षक तात्पुरता केंद्र
संगणक मार्गदर्शक म्हणून नेमणे. जो छोट्या
छोट्या बाबीकडे लक्ष देईन व संगणक वापरात
येणाऱ्या प्राथमिक अडचणी सोडवेल. ही भूमिका
सक्षम केंद्रप्रमुख देखील करू शकतील.
८) शिक्षकांना हे ओझे वाटू नये म्हणून त्यांना
काहीतरी प्रलोभन / अमिष असावे.
(पुरस्कार,गौरवपत्र, गोपनीय अभिलेखात नोंद )
९) केंद्रातील ICT lab चा प्रशिक्षणासाठी वापर
करणे.
१०) ज्या ठिकाणी शिक्षक संगणक वापराविषयी
अकार्यक्षम आहेत अशा शाळेवरील हुशार मुलांना
प्रशिक्षण देणे.
प्रशिक्षण – (याची गरज आहे) –
MS-CIT झालेल्या बऱ्याचशा लोकांना सराव
नसल्याने संगणक हाताळता येत नाही म्हणून
सरावात्मक प्रशिक्षणाची निश्चितच गरज आहे.
त्यासाठी खालील बाबींचे प्रशिक्षण दिल्यास शाळेत
ICT चा वापर सुरु करता येईल.
१) दिवस पहिला –MS-Word
२) दिवस दुसरा–MS-Excel
३) दिवस तिसरा–MS-PowerPoint
४) दिवस चौथा - MS-PowerPoint आणि
Video editing
५) दिवस पाचवा –Internetआणि Hardware
(सर्वच बाबी एका दिवसात शिकविणे शक्य नाही
परंतु आवश्यक बाबीचा समावेश करून त्या एका
दिवसात घेता येतील.)
काही महत्वपूर्ण बाबी -
१) अध्यापनात मदत करणाऱ्या ठरतील आणि
विद्यार्थ्यांना सहजपणे समजेल अशा पाठ्यक्रमावर
आधारित डिजिटल साहित्य बनविणे. जेणेकरून शाळांत
पडून असलेले संगणक वापरात येतील.
२) मुलांना प्रत्यक्ष माहिती तंत्रज्ञानाची ओळख
व्हावी या साठी पाठ्यक्रम बनविणे व तो शाळा
शाळांत राबविण्यासाठी प्रोत्साहित करणे.
३) राज्य पातळीवर डिजिटल साहित्य तयार करणे व
तयार झालेले साहित्य विनामूल्य अथवा अल्प दरात
शाळांपर्यंत पोहोचविणे.
४) शाळा, कार्यालय पेपर लेस होण्यासाठी संगणक
प्रणाली विकसित करणे. त्यांचा सातत्याने वापर
करणे.
५) शिक्षकांसाठी पटनोंदणी / पंजिका सर्वेक्षण
तथा मूल्यमापन (वेळखाऊ व क्लिष्ट बाबी)
यासाठी संगणक प्रणाली विकसित करणे.
६) तालुका स्तरावर वारंवार लागणारा शिक्षक,
शाळा, विद्यार्थी याचा डेटा संकलित करून त्याची
डिजिटल लायब्ररी करणे.
७) तंत्रज्ञानाचा वापर प्रभावीपणे करणाऱ्या
शिक्षकांना प्रोत्साहन देणे (तशी तरतूद गोपनीय
अभिलेखामध्ये असावी ) जेणेकरून लोक याकडे
वळतील.
८) शाळेतील विद्युत आणि इंटरनेट सुविधेसाठी
शासन स्तरावरून (जिल्हा परिषद / पंचायत समिती /
ग्रामपंचायत) १०० % अनुदान मिळणेसाठी प्रयत्न
व्हावेत. वीजबिल माफ असावे.वीज बिलामुळे अनेक
शाळांत पुरवठा खंडित झालेला आहे.
९) वरिष्ठ स्तरावरून शाळेकडे मागितलेली माहिती
इमेल च्या माध्यमातून मागितली जावी. जेणेकरून
संगणकाचा वापर तर होईलच पण शिक्षकांचे कायम
बाहेर जाणे बंद होईल.
१०) शिष्यवृत्ती / प्रज्ञाशोध प्रमाणे मुलांसाठी
माहिती तंत्रज्ञानासाठी एखादी परीक्षा / पुरस्कार
सुरु करणे. ज्यात माहिती तंत्रज्ञानावर आधारित
मूल्यमापन असेल.

2 comments:

Unknown said...

Great. Plan sir

Unknown said...

विचार चांगले आहेत