शैक्षणिक उपक्रम-्ज्योतीताई

नमस्कार मित्रांनो
केवणीदिवे शाळेच्या उपक्रमशील, कृतिशील शिक्षिका ज्यांना नावीन्यपूर्ण उपक्रमांचा ध्यास आहे ,नेहमी अध्ययन अध्यापनात सृजनशीलतेशी नाते ठेवतात अशा सौ.ज्योतीताई दिपकराव बेलवले  मॅडम यांची उपक्रमांची मालिका मी घेऊन येत आहे 

उपक्रमाचे नाव:: ENGLISH FRIEND 
📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝
 

    🌺    English friend ,....benches 🌺


इंग्रजी विषयाबद्दल आवड निर्माण होण्यासाठी व इंग्रजी वाचनाची भिती नाहीशी होण्यासाठी केलेला छोटासा प्रयत्न .शब्दांची सुरुवात सारख्याच अक्षर गटाने होत असल्याने..वाचन सहज शक्य व आवड देखील निर्माण होते. त्याच बरोबर ज्या शब्दाचा अर्थ माहिती नाही ..तो जाणून घेण्यासाठी इंग्रजी शब्दकोशाचा वापर करुन अर्थ शोधल्याने ..जिज्ञासा जागृत होऊन.स्वयंशोधन प्रवृत्तीने अर्थ शोधला जातो.शब्द बाकावरच लिहल्याने ते खूपच जवळचे वाटतात. वाचन हसतखेळत होते. कुठलेही टेंशन न घेता.मधल्या सुट्टीत वाचन व अर्थ शोधायचा,.मदत लागलीच तर आधी मित्रांची घ्यायची. अगदिच आवश्यकता असल्यास शिक्षकांची मदत घ्यायची. मुले आनंदाने सहभागी होतात. एकमेकांना सहकार्य करतात.

             ज्योती बेलवले
       शाळा...केवणीदिवे..भिवंडी ..ठाणे.

📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝



📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝🐊
      उपक्रमाचे नाव ::  माझा शब्द व त्याचा अर्थ

आज सायंकाळी मुले म्हणाली मँडम काही नविन शिकवा ना..मी क्षणाचाही विलंब न करता म्हटले ..चला तर  वही पेन घ्या .आपण खेळ खेळू.मुले आनंदाने पटांगणात येऊन बसली.

    मी त्यांना इंग्रजी वर्तमानपत्रातील एक एक कागद दिला व म्हटले यातील कुठलीही बातमी वाचा व नवीन १० शब्द वहीत लिहा. मुलांनी वाचून
 शब्द लिहले.

     मी  इंग्रजी शब्दकोश मुलांसमोर ठेवून ..नवीन शब्दांचा अर्थ कसा शोधावा हे स्पष्ट केले व सांगितले की आता तुम्ही सर्वांनी वहीत लिहलेल्या शब्दाचा अर्थ शोधा.सगळ्यांनी व्यवस्थित आपआपल्या शब्दांचा अर्थ शोधला. अर्थ सापडल्यावर त्यांच्या चेहर्यावरील भाव..शब्दात वर्णन नाही करु शकत.

                  ज्योती बेलवले.

📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝📝

3)माझा उपक्रम ....संदेश बाहुल्या.

जुन्या वहीच्या पुठ्ठ्यावर बाहुलीचा व बाहुलाचा आकार काढून तो कापला..त्यावर कार्डपेपर चिटकवला या बाहुल्यांवर स्वच्छतेचेसदेश, चांगल्या सवयी, घोषवाक्ये , म्हणी इ. चे लेखन करता येते. या बाहुल्या खिडकीच्या वर तोरणासारख्या लावल्यास छान दिसतात.

फायदे..मुलांचा प्रत्यक्ष सहभाग असल्याने नवनिर्मीतीचा आनंद मिळतो. कृतीतून शिक्षण मिळते. टाकाऊतून टिकावू याचे महत्त्व पटते. वस्तूचा पुनर्वापर करण्याची दृष्टी निर्माण करता येते.

No comments: